Manasvi Choudhary
मराठी संस्कृतीत घरी सुवासिनी किंवा कुमारिका आली तर तिला हळद-कुंकू लावल्याशिवाय घराबाहेर पडू दिलं जात नाही.
तसेच सणावाराच्या दिवसांमध्ये देवपूजा करताना महिला हळद-कुंकू लावतात.
विवाहितेसाठी ‘कुंकू’ हा सौभाग्यालंकार आहे म्हणूनच हळद-कुंकू लावण्याची शास्त्रात काही पध्दती सांगितल्या आहेत.
कुंकू कोणत्या बोटानं लावावं? हेच आज जाणून घ्या
शास्त्रानुसार, दुसऱ्या व्यक्तीला कुंकू लावायचं झाल्यास, मध्यमेचा वापर करावा.
पुरुष किंवा महिला, दुसर्यांना कुंकू लावतांना मध्यमेचा वापर करणं फायद्याचं ठरतं अशी मान्यता आहे.
दुसर्या व्यक्तीच्या कपाळावर स्पर्श करताना त्याच्यातील वाईट शक्तींचा संचार आपल्या शरीरात बोटाच्या माध्यमातून होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत मध्यमा बोटाचं बळ ते थोपवून धरतं आणि आपल्या शरीराचं रक्षण करतं.