Cracking Fingers: वारंवार बोटे मोडल्याने शारीरिक आरोग्यावर होईल परिणाम, जाणून घ्या कारण आणि उपाय

Dhanshri Shintre

हात दुखणे

हात दुखणे आणि थकवा कमी करण्यासाठी काही लोक बोट फोडतात, पण वैद्यकीय दृष्टिकोनातून हे सवय आरोग्यास हानिकारक मानली जाते.

आरोग्य समस्या

आज आपण जाणून घेणार आहोत की जास्त बोटे फोडल्यास कोणत्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. यामुळे तुम्हाला योग्य माहिती मिळेल.

संधिवात किंवा गाउट

वारंवार बिनधास्त बोटे फोडणाऱ्यांना संधिवात किंवा गाउट होण्याचा धोका वाढतो, ज्यामुळे सांधे सुजण्यासही त्रास होतो.

मऊ ऊतींना सूज येते

वारंवार बोटे फोडल्यामुळे हातातील मऊ ऊतींना सूज येते आणि हाडे लवकर कमजोर होऊ शकतात, त्यामुळे ही सवय टाळणे आवश्यक आहे.

मानसिक तणाव

कधी कधी बोटे फोडण्याची सवय मानसिक तणावाचं लक्षण असते. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक फायदेशीर ठरू शकतं.

सांधेदुखी

जर तुम्हाला आधीच सांधेदुखी किंवा सूज असेल, तर बोटे फोडू नयेत, कारण यामुळे वेदना आणि सूज अधिक वाढू शकते.

धार्मिक दृष्टी

फक्त आरोग्याच्याच नव्हे तर धार्मिक दृष्टीनेही बोटे फोडणे चुकीचे मानले जाते, कारण यामुळे लक्ष्मी नाराज होऊन आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात.

NEXT: घराच्या पायऱ्यांखाली कोणत्या वस्तू ठेवू नयेत? त्रास होण्याची शक्यता

येथे क्लिक करा