किचनच्या फरशीवर असणारे हट्टी डाग चुटकीसरशी काढा

Surabhi Jayashree Jagdish

घरातील किचन

घरातील किचन स्वच्छ ठेवणं हे सर्वात मोठं काम आहे. यामध्ये दररोज स्वयंपाक करताना तेल सांडतं. सांडलेल्या तेलाटा डाग काढणं फारच कठीण काम मानलं जातं.

क्लिनर

काही सोप्या घरगुती उपायांनी तेलाचे डाग निघू शकतात. यासाठी महागडे क्लिनर वापरण्याची गरज नाही. घरातल्या वस्तूंनीच स्वच्छता करता येते.

बेकिंग सोडा आणि लिंबू

बेकिंग सोडा आणि लिंबाची पेस्ट तयार करा. तो डागांवर लावा आणि काही वेळ ठेवा. नंतर ओल्या कपड्याने पुसून टाका.

व्हिनेगर आणि गरम पाणी

व्हिनेगर आणि गरम पाणी स्प्रे बाटलीत मिसळा. हे मिश्रण डागांवर शिंपडा आणि स्वच्छ करा. यामुळे तेलाचा डाग सहज निघून जातो.

साबण आणि बेकिंग सोडा

हे तेलाचे डाग घालवण्यासाठी डिश सोप आणि बेकिंग सोडा वापरा. हे मिश्रण तेल पटकन काढतं. यामुळे किचन चमकदार दिसू लागतं.

खोबरेल तेल आणि व्हिनेगर

खोबरेल तेल आणि व्हिनेगरचा वापरही करता येतो. हे मिश्रण डागांवर चांगलं काम करतं. यामुळे जुने डागही निघून जातात.

पीठ किंवा कॉर्नफ्लोअर

डाग घालवण्यासाठी पीठ किंवा कॉर्नफ्लोअर वापरून पहा. यामुळे तेल शोषून घेऊन डाग कमी होतात. यामुळे फर्शीवरील जुने डागही स्वच्छ होतात.

Kolhapur Tourism: खरंच लोणावळा-खंडाळा विसराल; कोल्हापूरपासून फक्त २१ किमी लांब आहे हे हिल स्टेशन

येथे क्लिक करा