Sakshi Sunil Jadhav
सध्या मोबाईल हा सगळ्यांच्याच जीवनातला अविभाज्य घटक बनला आहे. त्यामुळे दरमहिन्याला तुम्हाला जवळपास ३०० ते ४०० रुपयांचा रिचार्ज करावा लागत असेल.
आता जिओने ग्राहकांसाठी एका महिन्याच्या रिचार्जच्या किमतीत तब्बल ८४ दिवसांचा रिचार्ज प्लान सादर केला आहे. पुढे आपण त्याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.
Reliance Jio 84 दिवसाच्या प्लानमध्ये म्हणजेच जवळपास 3 महिन्यांच्या वैधतेसोबत एक स्वस्त प्लानही उपलब्ध आहे. हा प्लान खास करून त्या वापरकर्त्यांसाठी उपयुक्त आहे ज्यांना प्रामुख्याने कॉलिंगची सुविधा हवी असते.
Reliance Jio कडे 84 दिवस वैधता असलेला सर्वात स्वस्त प्रीपेड रिचार्ज प्लान 448 रुपयांचा आहे.
तुम्हाला या प्लानमध्ये वापरकर्त्यांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा दिली जाते. या प्लानमध्ये रोमिंग कॉलिंगचाही समावेश आहे, त्यामुळे देशभरात जास्तीचं शुल्क लागत नाही.
कम्युनिकेशनसाठी या प्लानमध्ये एकूण 1000 एसएमएसची सुविधा दिली जाते. मात्र या रिचार्ज प्लानमध्ये मोबाईल डेटा उपलब्ध नाही, त्यामुळे हा पूर्णपणे कॉलिंग प्लान आहे.
ज्यांच्या घरात किंवा ऑफिसमध्ये WiFi इंटरनेट उपलब्ध आहे, अशा वापरकर्त्यांसाठी हा प्लान जास्त फायदेशीर ठरू शकतो. या प्लानसोबत वापरकर्त्यांना JioTV आणि JioAI Cloud सारख्या कॉम्प्लिमेंटरी अॅप्सचा अॅक्सेस मिळतो.
448 रुपयांचा रिचार्ज प्लान MyJio अॅप किंवा अधिकृत वेबसाइटवर प्रीपेड रिचार्जमधील Value Category मध्ये उपलब्ध आहे.