साम टिव्ही ब्युरो
आधुनिक व स्पर्धात्मक धावपळीच्या जीवनात आपले शरीर व मन खूप थकून जाते.
ताण-तणाव, मनात सुरू असलेले वेगवेगळे विचार, भीती, काळजी अशा अनेक कारणांनी आपले शरीर व मन थकते.
आपल्या मेंदूचे कार्य अतिशय संतुलित राहणे आवश्यक आहे. त्यासाठी नियमित ध्यानधारणा आवश्यक आहे.Sa
नियमित व्यायामाने शरीर, इंद्रिये आणि मन निरोगी ठेवण्यास मदत होते.
धावपळीच्या जीवनात शरीराकडे, आरोग्याकडे लक्ष देणे व संतुलित आहार घेणे गरजेचे आहे.
यासाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेअंतर्गत ९ ते ११ डिसेंबरदरम्यान पुण्यात पाच वेगवेगळ्या ठिकाणी तीन दिवसीय ‘स्वास्थ्यम्’ उपक्रम आयोजित केला आहे.