Relationship: तुमच्याशी कोण फ्लर्ट करतंय? ओळखा एका क्षणात

Bharat Jadhav

मी सिंगल आहे

जर एखादा कोणी वारंवार तुम्हाला मी सिंगल आहे हे सांगत असेल. तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असेल, तर समजून घ्या समोरची व्यक्ती तुमच्याशी फ्लर्ट करतेय.

स्पर्श करण्याचा प्रयत्न

समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलण्याच्या बहाण्याने तुम्हाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करते.

वारंवार तुमच्या पाहत असेल

जर कोणी तुमच्याकडे वारंवार गुपचूप पाहत असेल. तुमच्याकडे पाहण्याच्या बहाण्याने तुम्हाला शोधत असेल हे फ्लर्ट असल्याचं समजा.

बोलताना पाहणं

तुम्ही एखाद्याशी बोलत असाल आणि ती व्यक्ती तुमच्याकडे फक्त पाहत असेल. तेही फ्लर्ट असते.

हँग आउट करणं

तुम्ही कोणाशी बोलत असाल आणि तुम्ही त्याच्यासोबत कुठेतरी जावे असे त्याला वाटत असेल.

प्रशंसा करणं

कोणी तुमची वारंवार स्तुती करत असेल तर कधी तुमच्या डोळ्यांबद्दल, कधी तुमच्या ड्रेसिंग सेन्सबद्दल तर हे फ्लर्टिंग असतं.