Ruchika Jadhav
किशोरवयीन मुलामुलींमध्ये अनेकदा त्यांचे गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड असल्याचे दिसते.
प्रेम ही भावना लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांमध्येच असते.
अशात प्रेमासाठी योग्य वय कोणतं असा प्रश्न तुमच्याही मनात अनेकदा आलाच असेल.
प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे. त्यामुळे त्याला वयाचे बंधन नाही.
मात्र गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड अशा नात्यात एख्याद्याचा स्विकार करताना वयाची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे.
शाळकरी अथवा महाविद्यालयीन मुलांनी आपल्या अभ्यासाला प्रथम प्राधान्य द्यावे.
जेव्हा तुम्ही तुमचे शिक्षण पूर्ण करता त्यानंतर नोकरी आणि नंतर मग गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड अशा नात्याचा तुम्ही विचार करावा.
कारण या वयात मुलगा अथवा मुलगी दोघांना नात्यांमधला खरा अर्थ समजू लागतो.