ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नात्यात विश्वासाबरोबरच तुम्हाला नात्याबाबत काय वाटतं तेही महत्वाचं ठरतं. तेव्हा लग्नाआधीच तुमच्या पार्टनरला या काही गोष्टी विचारणे कधीही आवश्यक आहे.
आयुष्याचा जोडिदार निवडणे ही अत्यंत महत्वाची पायरी असते.
लग्न जुळवण्याच्या या कार्यक्रमात मुलगा- मुलगी यांनी एकमेकांना काही गोष्टी विचारल्या पाहिजेत
प्रत्येक व्यक्तीची आवडनिवड वेगळी असते. त्यामुळे आपल्याला आवडणारी गोष्टी दुसऱ्यालाही तितकीच आवडेल असे नाही. त्यामुळे आयुष्याचा जोडीदार कसा असा प्रश्न विचारा
व्यक्तिमत्त्वाबद्दल समजून घेताना त्याच्या आवडी-निवडीबद्दल जाणून घ्या
अनेकवेळा मुलगा मांसाहारी असतो आणि मुलगी शाकाहारी असते. किंवा बरोबरच याच्या उलटे असते. अशावेळी आहाराच्या सवयींमुळे लग्नानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात.
प्रत्येक व्यक्ती निश्चितपणे विचार करते की लग्नानंतर त्याला कोणत्या प्रकारचे जीवन जगायचे आहे. प्रत्येक मुलीची तिच्या संसारासंदर्भातील काही कल्पना असते, अपेक्षा आणि भविष्यातील योजना असतात.
काही मुलींना लग्नानंतर गृहिणी म्हणून जगायचे असते, तर अनेक मुली आहेत ज्यांना लग्नानंतर नोकरी करताना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहायचे असते.
त्यामुळे तुमची तुमच्या जोडीदाराची अपेक्षा आणि मुलीची अपेक्षा या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता. म्हणजे नंतर यासंदर्भात वाद होण्याची वेळ येत नाही.