Newlywed Tips : नुकतंच लग्न झालंय? पहिल्या वर्षात नववधूंनी चुकूनही करू नका 'ही' ५ कामे, नात्यात येईल दुरावा

Shreya Maskar

लग्नानंतरचं पहिलं वर्ष

लग्नानंतरचं पहिलं वर्ष प्रत्येक जोडप्यासाठी खास असतं. या काळात एकमेकांना समजून घेणं, नवीन वातावरणाशी जुळवून घेणं आणि नात्यात विश्वास निर्माण करणं महत्त्वाचं असतं. मात्र, काही चुका नात्यात गैरसमज आणि दुरावा निर्माण करू शकतात.

First year after marriage | pinterest

स्वतःची ओळख विसरू नका

लग्नानंतर नवीन कुटुंब, नवीन जबाबदाऱ्या आणि बदललेलं वातावरण यांच्याशी जुळवून घेताना अनेक महिला स्वतःच्या आवडी-निवडींकडे दुर्लक्ष करतात. मात्र, संसार सांभाळताना स्वतःचं व्यक्तिमत्त्व हरवू देऊ नका. आनंदी आणि समाधानी व्यक्ती नात्यातही सकारात्मकता आणू शकते.

Newlywed Tips | pinterest

मनातल्या गोष्टी दाबून ठेवू नका

नवीन नात्यात सुरुवातीला प्रत्येक गोष्ट बोलून दाखवणं अवघड वाटू शकतं. मात्र, एखादी गोष्ट खटकत असेल किंवा मन दुखावलं असेल तर ती मनात साठवून ठेवू नका. जोडीदाराशी शांतपणे संवाद साधा. मनातील भावना, अपेक्षा आणि अडचणी मोकळेपणाने सांगितल्यास गैरसमज कमी होण्यास मदत होते.

Newlywed Tips | pinterest

जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका

लग्नानंतर प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच घडेल, अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही. दोघांच्या सवयी, विचार आणि आवडीनिवडी वेगळ्या असू शकतात. त्यामुळे एकमेकांना समजून घेण्यासाठी वेळ द्या.

Newlywed Tips | pinterest

आर्थिक स्वातंत्र्याकडे दुर्लक्ष करू नका

सुखी संसारासाठी आर्थिक नियोजन महत्त्वाचं असतं. लग्नानंतर आर्थिक बाबींची संपूर्ण जबाबदारी जोडीदारावर सोपवण्याऐवजी दोघांनी मिळून खर्च, बचत आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांवर चर्चा करावी. स्वतःचं आर्थिक स्वातंत्र्य, बचत आणि करिअर यांनाही महत्त्व द्या.

money | pinterest

कुटुंबीयांच्या हस्तक्षेपामुळे नात्यात दुरावा नका

लग्नानंतर दोन्ही कुटुंबांशी नातं जपणं महत्त्वाचं असतं. मात्र, प्रत्येक छोट्या निर्णयात इतरांचा हस्तक्षेप होऊ देऊ नका. पती-पत्नीने एकमेकांशी चर्चा करून स्वतःचे निर्णय घ्यावेत. दोन्ही कुटुंबांचा आदर राखतानाच आपल्या नात्याच्या खासगीपणाचं आणि मर्यादांचं भान ठेवावं.

Newlywed Tips | pinterest

सुखी संसाराचा मंत्र

एकमेकांच्या भावना आणि मतांचा आदर करा. घरातील कामं आणि जबाबदाऱ्या दोघांनी मिळून सांभाळा. विश्वास, प्रेम आणि मैत्री या तीन गोष्टी नात्यात जपण्याचा प्रयत्न करा.

Mantra of happy world | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

Note | pinterest

NEXT : प्रेमाच्या भरात चुका करू नका! जोडीदारामध्ये लग्नाआधी दिसणारे ‘हे’ संकेत दुर्लक्ष करणे पडेल महागात

relationship tips | pinterest
येथे क्लिक करा...