Relationship Advice : शत्रूवर विश्वास ठेवणं एकवेळ चालेल, पण या ७ लोकांपासून आजपासूनच राहा दूर

Sakshi Sunil Jadhav

जवळची नाती

नातं कोणतंही असो, विश्वास ठेवण्याआधी समोरच्या व्यक्तीचा स्वभाव आणि वागणूक समजून घेणं गरजेचं आहे. काही लोक आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ शकतात.

toxic people

बोलण्यातला फरक

समोरची व्यक्ती मोठमोठ्या गोष्टी सांगते, पण वेळ आली की तिची कृती पूर्णपणे वेगळी असते, तर सावध व्हा. अशा व्यक्तींवर लगेच विश्वास ठेवू नका.

trust issues

कामापुरती आठवणारे

काही व्यक्तींना आपली आठवण फक्त कामासाठीच येते. काम झाल्यानंतर ते पुन्हा संपर्कातही राहत नाही. अशा नात्यांवर विचार करा.

warning signs

‘नाही’चा आदर न करणारे

तुम्ही एखाद्या गोष्टीला नकार दिल्यानंतरही समोरची व्यक्ती दबाव टाकत असेल, तर हे दुर्लक्षित करू नका.

boundaries in relationships,

खोटारडे लोक

विश्वास निर्माण होण्यासाठी बराच वेळ लागतो, पण सततच्या खोट्यामुळे तो क्षणात डळमळू शकतो. सारखं खोटं, गोष्टी लपवणं किंवा जास्त स्पष्टीकरण देणं दिसत असेल तर सावध राहा.

self respect

स्वतःच्या चुका

प्रत्येकाकडून चुका होतात, पण त्या मान्य करण्याची तयारीही तितकीच महत्त्वाची असते.

self respect

निंदा करणारे लोक

जो व्यक्ती सतत इतरांची खासगी माहिती सांगतो किंवा सतत निंदा करतो, त्याच्यावर सहज विश्वास ठेवू नका. कारण तो इतरांसमोर तुमच्याहीबद्दल अशाच प्रकारे बोलत असेल.

emotional safety

लक्षात ठेवा

शेवटी प्रत्येक व्यक्तीवर संशय घेणं योग्य नाही. मात्र, एखाद्याच्या वागण्यात हे संकेत सारखे दिसत असतील, तर भावनेपेक्षा विवेकाला प्राधान्य द्या.

healthy boundaries

NEXT : १, २ की ३ बँक अकाउंट? जास्त अकाउंट्स असतील तर ७ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात

savings account
येथे क्लिक करा