ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुलींना आकर्षित करण्याची इच्छा प्रत्येक मुलाची असते.
यासाठी स्टायलिश-फॅशनेबल होण्यासोबतच काही आणखी गोष्टींची काळजीही घेणं गरजेचं असतं.
मुलांच्या बारिक- सारिक गोष्टींकडे मुली कटाक्षाने लक्ष ठेवून असतात.
छोट्या छोट्या या निर्णयात्मक गोष्टीच खर तर तुमच्या जीवनाचा आनंद शोधतात.
मुलींना पाहून काही मुले अगदी उतावीळ वर्तन करु लागतात. त्यांचं हे उतावीळ वर्तन मुलींना आवडत नाही.
बरेचदा मुले फारच बोरिंग करतात. मुलींना अशी बोरिंग मुले आवडत नाहीत. त्यांना आपल्याला हसवणारी आणि गुंतवून ठेवणारी मुले आवडतात.
काही मुले मुलींसमोर आपण किती महान आहोत, हे सांगत वा दाखवत बसतात. असं आपणच आपल्या तोंडून सांगितल्याने मुली पटत नाहीत तर त्या दोन हात दूर जातात. कारण स्वत:च्याच तोंडून स्वत:ची बढाई मारणारी मुले मुलींना आवडत नाहीत.
एखाद्या मुलीसोबतच नव्हे तर कुणासोबतही अनादराने वागू नका. उलट समोरच्या व्यक्तीचा आपण किती आदर करतो, हे मुली पाहत असतात.