Sakshi Sunil Jadhav
नातं मजबूत आणि आनंदी राहावं असं प्रत्येकालाच वाटतं. पण अनेकदा प्रेमात असताना आपण काही महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. हेच इशारे पुढे जाऊन नात्यात भांडणं, दुःख आणि तुटण्यासाठी कारणी भूत ठरतात.
पार्टनर छोट्या-छोट्या गोष्टींमध्येही खोटं बोलत असेल, तर हा मोठा इशारा आहे. विश्वास आणि प्रामाणिकपणावरच नात्याची पायाभरणी असते.
तुम्ही कुणाशी बोलावं, काय घालावं, कुठे जायचं हे जर पार्टनर ठरवत असेल, तर ते प्रेम नसून कंट्रोलिंग वर्तन आहे. तुमच्या भावनांकडे यामध्ये दुर्लक्षित केलं जातं.
''तू जास्त विचार करतोस'' किंवा ''यात काही मोठं नाही'' असं सतत ऐकायला मिळत असेल, तर तुमच्या भावनांची किंमत केली जात नाही, हे लक्षात घ्या.
नात्यात चुका दोघांकडूनही होऊ शकतात. मात्र समोरची व्यक्ती कधीच माफी मागत नसेल आणि नेहमी तुम्हालाच दोष देत असेल, तर हा मोठा रेड फ्लॅग आहे.
प्रेमासोबत टोमणे, अपमान किंवा मजेत कमी लेखणं हे टॉक्सिक रिलेशनशिपचे स्पष्ट लक्षण आहे. नात्यात रिस्पेक्ट महत्वाचा आहे.
चांगल्या काळात सगळेच सोबत असतात. पण कठीण प्रसंगी पार्टनर लांब राहात असेल, तर नातं एकतर्फी असल्याचे संकेत आहेत.
थोडीशी जळफळाट ठीक असते, पण प्रत्येक गोष्टीवर संशय घेणं, फोन तपासणं हे नात्यासाठी घातक ठरू शकतं.