Shruti Vilas Kadam
जर तो रागाच्या भरात तुमच्यावर ओरडून बोलत असेल. सतत चिडचिड करत असेल, तर हे चुकीचे वर्तन आहे. अशा सवयी नात्यात नकारात्मकता निर्माण करतात.
समजूतदार व्यक्ती आपल्या चुकीची जबाबदारी स्वीकारतात. मात्र, जर तो प्रत्येक वादात दोष तुमच्यावर टाकत असेल, तर ते नात्यासाठी घातक ठरू शकते.
मजेत जरी असले तरी तुमची तुलना त्याच्या एक्स पार्टनरशी केली जात असेल. किंवा तुमच्या एक्स पार्टनरची आठवण काढत असेल, तर ते तुमचा आत्मसन्मान दुखावणारे वर्तन आहे. अशा तुलनेमुळे नात्यात असुरक्षिततेची भावना वाढते.
जर तो तुमच्यापासून गोष्टी लपवत असेल किंवा इतर मुलींशी बोलत असेल, तर त्यामुळे विश्वासाला तडा जातो. विश्वास नसने ही कोणत्याही नात्यासाठी गंभीर समस्या ठरते.
तुमच्या भावना समजून घेण्याऐवजी त्याला केवळ आपले मतच योग्य वाटत असेल किंवा तो तुमच्या भावनांना “अतिसंवेदनशील” म्हणून हसण्यावारी नेत असेल, तर हा एक मोठा रेड फ्लॅग आहे.
भांडणानंतर संवाद साधण्याऐवजी मुद्दाम गप्प राहणे, दुर्लक्ष करणे किंवा संपर्क तोडणे हे टॉक्सिक वर्तनाचे लक्षण आहे. यामुळे नात्यातील संवाद कमी होतो.
जर तो सतत “मी बिझी आहे” असे सांगून तुम्हाला वेळ देत नसेल, किंवा नात्याबाबत गंभीर नसेल, त्याला तुमच्याविषयी काय भावना आहेत सांगत नसेल तर तो तुमच्या भावनिक गरजांचा आदर करत नाही.