Egg : कच्चं की उकडलेलं अंडं; जास्त प्रोटीन कशात, आरोग्यासाठी काय सुपरहेल्दी?

Shreya Maskar

कच्चं की उकडलेलं अंडं?

सकाळच्या नाश्त्यासाठी अंड खाणे हा सर्वात सोपा आणि पौष्टिक पदार्थ आहे. अनेक लोक उकडलेले अंड खातात तर अनेक कच्च्या अंड्याचे पदार्थ बनवून खातात. आज आपण जाणून आरोग्यासाठी कच्चे की उकडलेले अंड चांगले, हे जाणून घेऊयात.

raw or boiled egg | pinterest

डॉक्टारांचे मत

डॉ. शुभम वात्स्य म्हणतात की, संशोधनातून हे दिसून आले आहे की, कच्च्या अंड्यांमधील प्रथिने केवळ ५० टक्केच पचण्यायोग्य असतात. याचा अर्थ असा की, कच्च्या अंड्यातील प्रथिनांपैकी केवळ अर्धीच प्रथिने शरीराद्वारे सहजपणे पचवली जातात. उलट उकडलेल्या अंड्यामध्ये हे प्रमाण ९०-९५% पर्यंत वाढते.

Doctor's opinion | pinterest

उकडलेले अंड

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, शिजवल्याने अंड्यांमधील प्रथिने नष्ट होत नाहीत, उलट त्यांचे विकृतीकरण होते. उष्णतेमुळे प्रथिनांची रचना मोकळी होते, ज्यामुळे पाचक एन्झाईम्स ते अधिक सहजपणे पचवता येते.

boiled egg | pinterest

कच्चे अंड

कच्च्या अंड्यांमध्ये असलेले 'ॲव्हिडिन' हे 'बायोटिन' किंवा व्हिटॅमिन बी७ शी बांधले जाऊ शकते आणि त्याचे शोषण कमी करू शकते. अंडी शिजवल्याने हे 'ॲव्हिडिन' मोठ्या प्रमाणात नष्ट होते, ज्यामुळे ही प्रक्रिया थांबते.

raw egg | pinterest

कच्च्या अंड्यांचा धोका

कच्च्या अंड्यांचा सर्वात मोठा धोका 'साल्मोनेला' संसर्गाचा आहे, ज्यामुळे अतिसार, ताप, उलट्या आणि अन्न विषबाधा होते. अंडी पूर्णपणे उकडल्याने किंवा शिजवल्याने या हानिकारक जीवाणूंचा धोका कमी होतो.

Dangers of raw eggs | pinterest

उकडलेली अंडी

उकडून अंडी खाल्ल्याने डोळ्यांना जास्त फायदा होतो. त्यातील ल्युटीन आणि झियाझॅन्थिनसारख्या डोळ्यांसाठी आरोग्यदायी अँटीऑक्सिडंट्सची जैवउपलब्धता वाढते. हे दोन्ही कॅरोटीनॉइड्स डोळ्यांमध्ये आढळतात.

Boiled eggs | pinterest

अंडी अशा प्रकारे खाणे चांगले?

डॉ. शुभम यांच्या मते, अंडी उकडलेली, ऑम्लेट किंवा स्क्रॅम्बल्ड स्वरूपात खाणे सर्वोत्तम आहे. प्रथिने, जीवनसत्त्वे, सुरक्षितता आणि पचन या प्रत्येक दृष्टिकोनातून, शिजवलेली अंडी खाणे हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Is it better to eat eggs this way? | pinterest

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | pinterest

NEXT : कोलेस्ट्रॉल नॉर्मल असूनही येतोय हार्ट अटॅक, 'हे' छोटे कारण ठरतेय धोकादायक

Heart Attack | AI PHOTO
येथे क्लिक करा...