Sunday Horoscope: काहींना आर्थिक लाभ, तर या ४ राशींच्या कामाच्या अडचणी होणार दूर; वाचा रविवारचे राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

दिवस चांगला राहील. जुनी अडकलेली कामे हळूहळू पूर्ण होतील आणि नोकरीत मेहनतीचे फळ मिळू शकते.

मेष | Saam tv

वृषभ

खर्च वाढू शकतो. घरगुती कामांवर जास्त पैसा खर्च होण्याची शक्यता असून नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. व्यवसायात नफा होण्याचे संकेत आहेत.

वृषभ राशी | SAAM TV

मिथुन

रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता असून कुटुंबाचा चांगला पाठिंबा मिळेल. नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल, पण थकवा जाणवू शकतो.

Mithun Rashi Bhavishya | Yandex

कर्क

कामात सकारात्मक परिणाम दिसतील. जुने तणाव कमी होतील आणि कुटुंबासोबत चांगला वेळ घालवता येईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.

कर्क | Saam TV

सिंह

घाईगडबड टाळणे आवश्यक आहे. कामाचा ताण वाढू शकतो आणि पैशांच्या व्यवहारात सावधगिरी बाळगावी लागेल. नातेसंबंधात किरकोळ वाद होण्याची शक्यता आहे.

सिंह राशी | Saam Tv

कन्या

दिवस लाभदायक ठरू शकतो. मेहनतीचं चांगलं फळ मिळेल आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल.

Kanya Rashi | Saam TV

तुळ

अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल आणि जोडीदाराचे सहकार्य लाभेल. व्यवसायात नफा मिळण्याचे संकेत असून आरोग्य सामान्य राहील.

तुळ | saam tv

वृश्चिक

संयमाने काम करा. काही कामांमध्ये उशीर होऊ शकतो आणि नोकरीत जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. आर्थिक निर्णय घेताना काळजी घ्या.

Vruchik Rashi Bhavishya | Saam TV

धनु

काळ अनुकूल राहण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल तसेच अडकलेले पैसे परत मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Dhanu Rashi | Saam TV

मकर

दिवस साधा असेल. कामांमध्ये व्यस्तता वाढेल आणि मेहनतीचं फळ हळूहळू मिळू लागेल. खर्च विचारपूर्वक करा आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या.

मकर | Saam Tv

कुंभ

परिस्थिती हळूहळू सुधारताना दिसेल. मेहनतीचा योग्य परिणाम मिळेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल.

कुंभ | Saam Tv

मीन

संयम ठेवणे गरजेचे आहे. कामे पूर्ण होण्यासाठी वेळ लागू शकतो आणि नात्यांमध्ये गैरसमज टाळा. नोकरीत ताण जाणवू शकतो, त्यामुळे आर्थिक आणि आरोग्याच्या बाबतीत सावध राहणं गरजेचं आहे.

Meen Rashi | Saam TV

NEXT: लहान मुलांच्या आधार कार्डाचे नियम बदलले; आता आणखी २ कागदपत्रांची पडली भर, जाणून घ्या यादी

UIDAI notification
येथे क्लिक करा