Shruti Vilas Kadam
रवा – 1 कप, साखर – 1 कप, पाणी – ½ कप, तूप – 3–4 tbsp, खोवा किंवा दूध पावडर – ½ कप, काजू-बदाम तुकडे – 2 tbsp, वेलची पूड – ½ tsp
सुरुवातीला तूप गरम करून त्यात रवा हलक्या आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
वेगळ्या भांड्यात साखर व पाणी घेऊन एकतारी पाक बनवा.
पाकात भाजलेला रवा घालून सतत हलवत एकसंध मिश्रण तयार करा.
थोडे तूप व कापलेले ड्रायफ्रुट्स (काजू, बदाम) घालून चांगले मिसळा.
मिश्रण पातेल्यातून सुटू लागले की ते योग्य जाड झाले आहे.
मिश्रण तुप लावलेल्या ताटात ओतून समान पसरवा आणि वर ड्रायफ्रुट्स दाबून लावा. थंड झाल्यावर आपल्या पसंतीनुसार तुकडे कापून बर्फीसारखे सर्व्ह करा.