Monday Horoscope: प्रेमामध्ये लाभ अन् पैशाची चणचण कमी होईल, वाचा सोमवारचे खास राशीभविष्य

Sakshi Sunil Jadhav

मेष

घरामध्ये पाहुण्यांची लगबग होईल. आदरातिथ्यामध्ये मन व्यस्त असेल. कौटुंबिक सौख्याला दिवस चांगला आहे. मातृ सुखाला उधाण येईल. शेती व्यवसायात प्रगती होईल.

मेष राशी | saam

वृषभ

साधेपणाने जग जिंकता येते हे आपल्याकडे बघून कळते. आज काही विशेष पुरस्कार, सन्मान आपल्याला मिळण्याची दाट शक्यता आहे. प्रेमामध्ये लाभ होतील. आनंदी दिवस आहे.

वृषभ | Saam Tv

मिथुन

विविध पदार्थ खाण्याची आज लयलूट असेल. स्नेहभोजनाचे योग येतील. कौटुंबिक वातावरण अल्हाददायी असेल. वक्तृत्वाने, वाणीने सुखाची नवी भिंत उभी कराल. बँक व्यवहारात मात्र दक्षता घ्यावी.

मिथुन राशी भविष्य | Saam TV

कर्क

आपल्या राशीला आनंदाला कोणतेही कारण लागत नाही.सहज साध्या गोष्टीत आपण आनंदी असतात. आज अजून स्वमग्न असण्याचा दिवस आहे. एक वेगळा प्रभाव आपला इतरांवर राहील.

कर्क राशी | saam

सिंह

मोठी स्वप्न बघायला काहीच हरकत नाही असे आपल्या राशीचे म्हणणे असते. परदेशाची निगडित व्यवहार तसेच व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय आज होतील. अपयश आले तरी ती यशाची पहिली पायरी आहे, हे म्हणून पुढे जावे लागेल.

सिंह राशी | saam tv

कन्या

मित्र-मैत्रिणींच्या गराड्यात वेळ कसा जातो कळत नाही. आपलेच लोक कामी येतात हे आज जाणवेल. जुन्या गुंतवणुकी मधून फायदा होणार आहे. प्रेमामध्ये "थोडे तुझे माझे" होण्याची शक्यता आहे.

कन्या | Saam Tv

तूळ

प्रवासामध्ये प्रगती होईल. आपण केलेल्या कामाची योग्य ती पावती आज मिळेल.कार्यक्षेत्र रुंदावणारे राहणार आहे. बिनधास्तपणे नवीन जबाबदाऱ्या पेलायला आज तुम्ही तयार आहात त्याचे स्वागत करा.

तूळ राशी भविष्य | Saam TV

वृश्चिक

कुलस्वामिनीची उपासनेने आपल्याला न ठरवता काही गोष्टी सहज होतील. मोठे प्रवास होतील. नातवंड सौख्यामध्ये दिवस व्यस्त राहील. विद्यार्थ्यांसाठी चांगल्या संधी येतील.

वृश्चिक राशी भविष्य | Saam TV

धनु

तब्येतीची काळजी घ्यावी.एकट्याने धावपळ, दगदग आज होणार आहे. कोणाच्याही अमिषाला भुलून आज कामे करणे टाळा. काही गोष्टी एकट्यालाच प्रगती देतात हे लक्षात ठेवा.

धनु राशी भविष्य | Saam TV

मकर

आपण कायमच सचोटी चिकाटी आणि जिद्दीने काम करत आहात. कामाच्या ठिकाणी नवीन तंत्र मंत्र अवलंब करणे, व्यावसायिक जोडीदाराचे योग्य ते सहकार्य आज तुम्हाला मिळणार आहे. दिवस चांगला आहे .

मकर राशी भविष्य | Saam TV

कुंभ

मानसिक त्रास तणाव, सांधेदुखी, जुनाट विकार हे आज डोके वर काढतील. कामांमध्ये दिवस व्यस्त ठेवणे जास्त बरे राहील. संशोधनात्मक कार्यात विशेष प्रगती होईल. दिवस संमिश्र राहील.

कुंभ राशी भविष्य | Saam TV

मीन

काहीतरी नवे शिकण्याची इच्छा आज होईल. आपल्या एकूण सर्व गोष्टीत सृजनशीलता वाढेल. मन स्वस्थ चांगले असेल. दत्तगुरूंचे विशेष कृपा आशिर्वाद आज आपल्यावर असल्यामुळे धनयोग सुद्धा आहेत.

मीन राशी भविष्य | Saam TV

NEXT: Roasted Sweet Potato: कोळशावर भाजलेलं रताळ खाण्याची इच्छा, आता चुटकीत होईल पूर्ण, फक्त वापरा ही ट्रीक

bhatti style sweet potato
येथे क्लिक करा