Sakshi Sunil Jadhav
आयुष्यात प्रगती करण्यासाठी स्वतः काही गोष्टींसाठी आपण ठाम असावे लागते. आज तुम्ही घेतल्याने निर्णय योग्य ठरतील. आरोग्य उत्तम राहील. धावपळ आणि दगदग आपल्याला आवडते आणि तसाच आजचा दिवस असेल.
खर्चाला आज हात आखडता घेऊन चालणार नाही. रादर खूप खर्च होईल अशा काही गोष्टी घडतील. तब्येतीच्या तक्रारी वाढतील. विनाकारण खर्च झाल्यामुळे मनस्ताप सुद्धा वाढेल.
नव्याने ओळखी आणि परिचय करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. मैत्रीचे बंध दृढ होतील. जवळच्या लोकांबरोबर स्नेहभोजनाचे योग आहेत.
विविध वाहनांमधून फिरणे होईल. कामे मार्गी लागतील. आपल्या वरिष्ठ व्यक्तीकडून आपले कौतुक होईल. कदाचित बढतीचे योगही दिसत आहेत. दिवस चांगला आहे .
मोठ्या प्रवासाचे योग आहेत. कदाचित धार्मिक क्षेत्री भेटी देणे होईल. नातवंड सौख्याला दिवस उत्तम आहे. समाजामध्ये आपली एक चांगली पत आज निर्माण होईल. विशेष सन्मान होतील.
बुद्धी चातुर्य असणारी आपली रास आहे. आज मात्र कोणत्याही गोष्टी ढिलाई करून चालणार नाही. बेसावध राहू नका. एखाद्या गोष्टीत अडकण्याची शक्यता आहे. अधिक पैशाचा मोह आज बरा नव्हे.
जोडीदाराबरोबर सौख्य अनुभवाल. नव्याने काहीतरी खरेदी होईल. एकमेकांच्या अनुमतीने संसाराची पुढील वाट सुकर होईल. व्यावसायिक क्षेत्रातही चांगली घोडदौड आज राहील. कोर्ट कचेरीची कामे योग्य पार पडतील.
अबोला असूनही प्रेम लाभेल. अनेक दिवस गुंता न सुटलेल्या गोष्टी आज सहज सुटतील. आपल्याला खूप खंबीर राहावे लागेल. हितशत्रूंचा त्रास आहे पण त्यावर मात करावी लागेल. आपले, परके ओळखून पुढे गेलात तर दिवस चांगला आहे.
"छडी लागे छम छम, विद्या येई घमघम" असा काहीसा दिवस आहे.अभ्यासासाठी विशेष परिश्रम घ्यावे लागतील तर चांगले यश मिळेल. उपासनेला दिवस चांगला आहे. दत्तगुरूंची विशेष कृपा आपल्यावर आज राहील.
जुन्याचे नवे करण्यासाठी आज विशेषत्वाने झटाल. घरामध्ये काही नाविन्यपूर्ण गोष्टींचे आगमन होईल. जुन्या गोष्टी लयाला जातील. काहीतरी नवीन उर्मी घेऊन आलेला आजचा दिवस आहे. शेतीच्या कामात प्रगती होईल.
भावंडसौख्य चांगले आहे. जवळचे प्रवास होतील. जुने पत्रव्यवहार मार्गी लागून कामे सुरळीत होतील. शेजारील व्यक्तींचे योग्य ते सहकार्य आज आपल्याला लाभेल.
गोडधोड खाण्याचे योग आहेत. कुटुंबीयांचे सहकार्य आज चांगले लाभेल. धनदायी असा दिवस आहे. काही दिवस असे येतात - की असा विचार येतो, आयुष्यात आपल्याला कशाचीच कमी नाही. तो आजचा दिवस आहे .