Sakshi Sunil Jadhav
पोटाच्या तक्रारी त्रासदायक ठरतील. कदाचित पित्ताचे त्रास, दगदग, धावपळ अशा गोष्टींमुळे अडचणी उदभवतील. दिवसभराचे नियोजन योग्य करणे आज गरजेचे आहे. दिवस संमिश्र आहे.
जेवढे काम कराल तेवढे यश मिळते हे आपल्याला माहिती आहे. पण आज याच गोष्टी तुम्हाला सहज मिळणार आहेत. लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील. कला, क्रीडा क्षेत्रात सुद्धा प्रगती होईल.
घरामध्ये एखादे धार्मिक कार्य होण्याची शक्यता आहे. सर्वजण मिळून आनंदाने हे साजरी कराल. सुख समाधानाची पाऊलवाट नव्याने तयार होत आहे.त्याचा आनंद लुटा. सर्व सौख्याला दिवस चांगला.
प्रवासा मधून फायदा होईल. शेजारील व्यक्तीकडून वेळेला सहकार्य मिळेल. समाजात सन्मानही मिळतील. दिवस चांगला आहे. स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जा.
कामाच्या ठिकाणी अडचणी आल्या तरी त्यावर तुम्ही मात करून पुढे जाल. जोडीदाराच्या तब्येतीची मात्र आज काळजी घ्यावी लागेल. कौटुंबिक सौख्य आज चांगले राहणार आहे. धनाची आवक जावक खेळती राहील.
स्वतःचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या गोष्टी आज कराल. मन आनंदी आणि स्वस्थ राहील. निगेटिव्ह विचार नकारात्मक गोष्टी वेळीच झटकलेल्या बऱ्या असतात. हे आज जाणवेल. घेतलेले निर्णय योग्य ठरतील.
नवीन काही गोष्टी शिकण्याचा अट्टाहास आज करत असाल तर त्या तशाच होतील असं वाटत नाही. विद्यार्थ्यांना विनाकारण अडचणी येतील. हॉस्पिटलायझेशन वर खर्च होईल. काळजी घ्या .
जेवढे दिले जाते तितके आयुष्यात मिळतेच असे नाही. पण आज मात्र अनेक लाभ मिळण्याची योग आहेत. मग ते मैत्रीचे असो, धनाचे असो, व्यक्तीचे असो किंवा कर्माचे असो. दिवस चांगला जाईल.
कार्यक्षेत्रामध्ये आपल्या वाढ होणार आहे. सकारात्मकते बरोबरच योग्य ती धावपळ आणि धाडस केल्यामुळे यश आज पदरात पडेल. इतरांपेक्षा चार पावले आपण पुढे आहोत हे आज जाणवेल.
चर असणारी आपली रास आहे. आज प्रवासाचे योग आहेत. साधेपणाने शांततेने दिवस जाईल. भाग्य तुमची वाट पाहत आहे.
संशोधनात्मक कार्यात गती आणि प्रगती आहे. इतरांवर जास्त अवलंबून किंवा विश्वास ठेवून आज चालणार नाही. स्वतः कामांमध्ये झोकून देऊन कामे केल्यास यश तुमचे आहे.
संसारिक सुखाची आस आणि लालसा वाढेल. जोडीदाराच्या बरोबर चार चांगल्या गोष्टी कराल. कामासाठी एक वेगळा हुरूप घेऊन आज जगाल. दिवस चांगला आहे.