Sakshi Sunil Jadhav
"जगी सर्व सुखी असा कोण आहे" प्रत्येक सुखाची आशा ठेऊ नका. अल्प नाही पण आहे त्यात समाधान ठेवा. जास्त धडपड यश देणार नाही, बौद्धिक कामात यश भेटेल.
फार त्रास नाही तर फार सुख पण नाही असा एकंदरीत आजचा दिवस राहील. दैनंदिनी आहे तशीच राहिल, फक्त थोड्या प्रमाणात आरोग्याच्या समस्या जाणवतील. काळजी घ्यावी.
व्यावसायिकांसाठी उत्तम दिवस आहे. येणाऱ्या प्रत्येक संधीचं सोनं करा. अगाऊ पैसे देणं टाळा. प्रदेशाशी संबंधित एखादी डील आली तर सोडु नका.
कुणालाही न सांगता आपला उद्योग सुरू ठेवा. पण उद्योगाबाबत बोलताना नतद्रष्टता नसावी. नाविन्यपूर्ण काही कल्पना उद्योगात आचरणावी.
समाज कार्यात वेळ जाईल. कोणत्याही कामाला सहज लोकमान्यता मिळेल. स्वभावात तारतम्य बाळगावे. दत्तोपासना करावी.
पती / पत्नी वाद टाळावेत. उभयतांनी कुलदेवतेची उपासना करावी. घराबाहेर जास्त वेळ (पुरुषाने) घालवल्यास उत्तम. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल.
नवीन कपडे किंवा गरजेच्या वस्तू खरेदी कराल. कौटुंबिक आनंद गगनात मावेनासा होईल. विवाहाच्या अनेक वर्षांनंतर, नवविवाहीत असल्या सारखे वाटेल.
प्रेमात यश मिळेल आणि मिळालेलं यश टिकून राहील. श्री कृष्णाची उपासना करावी. घरातील वडीलधाऱ्यांचे आशिर्वाद मिळतील.
बांधकाम व्यावसायिकांना अतिशय उत्तम दिवस आहे. अनेक दिवसांच्या व्यवसायिक अडचणी दूर होतील. नवग्रह मंदिरात जाऊन पिवळे अन्नपदार्थ दान करावेत. शुभवार्ता भेटेल.
नौकरीत बढोतरी मिळण्याचे योग आहेत. घरातुन बाहेर पडताना दह्याचे गोड पदार्थ खाऊन निघा. मितभाषी असल्याने व्यावहारिक अडचणी येणार नाहीत.
पैसे जपून खर्च करा. दृष्ट लागली असल्यास आईच्या पदराने काढायला सांगा. खूप आकर्षक वस्त्र परिधान करणं टाळावं.
साडेसाती चालू आहे तरीही तुमची चैन आहे. कारण ज्या राशीचा स्वामी स्वयं गुरू आहे त्याचं कुणी काय करेल. पण साडेसातीत आपल्या ज्ञाताज्ञात केलेल्या पापांचा हिशोब होतो. निश्चिंत राहा छान दिवस आहे.