Shruti Vilas Kadam
दूध (फुल फॅट),लिंबूरस / व्हिनेगर, साखर, पाणी, वेलची / गुलाबजल (ऐच्छिक)
दूध गरम करून त्यात लिंबूरस / व्हिनेगर घालायचा, दूध फाटून छेना वेगळा होईल. नंतर थंड पाण्याने धुऊन पाणी पूर्ण काढून टाकायचे.
छेना मऊसूत होईपर्यंत ८-१० मिनिटं हाताने मळावा. गुळगुळीत, एकसंध मळ झाला कीच रसगुल्ले स्पंजी बनतात.
छेना छोटे-छोटे गोल बॉल्स बनवायचे. कुठेही क्रॅक नसावेत. साइज एकसारखी ठेवायची.
एका पातेल्यात साखर + पाणी उकळून हलकी, पातळ सायरप तयार करायची. त्यात वेलची / गुलाबजल घातल्यास सुगंध येतो.
पाक उकळत असताना गोळे त्यात हलक्या हाताने सोडायचे. झाकण ठेवून मध्यम आचेवर सुमारे १०-१५ मिनिटे शिजवायचे. ते फुगून दुप्पट आकाराचे होतील.
गॅस बंद करून रसगुल्ले सायरपमध्येच थंड होऊ द्यायचे. नंतर चिल्ड सर्व्ह केले तर अजून छान लागतात