Satish Daud
रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या प्रेमाचा सण म्हणून साजरा केला जातो.
आपल्या संरक्षणाचे वचन घेऊन बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते.
पण बायको नवऱ्याला राखी बांधू शकते का? असा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे.
तसं पाहता बायकोने नवऱ्याला राखी बांधने अयोग्य ठरणार नाही.
पुराणकथेनुसार पत्नीने पतीच्या मनगटावर रक्षासूत्र बांधून हा सण सुरू केला होता.
त्यावेळी देवराज इंद्राच्या पत्नीने श्रावण पौर्णिमेच्या दिवशी एक रक्षासूत्र इंद्राच्या मनगटावर बांधले.
यामुळे देवतांची शक्ती वाढली आणि ते राक्षसांवर विजय मिळवू शकले.
या दिवसापासून रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाऊ लागला, असं अनेकांचं म्हणणं आहे.