Manasvi Choudhary
रक्षाबंधन हा सण येत्या रविवारी साजरा होणार आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिण-भावाला राखी बांधते.
राखी बांधताना ताटात कोणत्या शुभ वस्तू ठेवाव्यात हे जाणून घ्या.
रक्षाबंधनापूर्वी बहिणी आरतीचे ताट सजवतात.
भावाला राखी बांधताना आरतीच्या ताटातील वस्तूंना विशेष महत्व आहे.
आरतीच्या ताटात कुंकू असावा. कुंकू हे विजयाचे प्रतिक आहे.
भावाला ओवाळणीच्या ताटात अक्षता असाव्यात. भावाच्या कपाळावर अक्षता लावणे शुभ मानले जाते.
ओवाळणीच्या ताटात दिवा असावा. यामुळे भावाला वाईट नजर लागत नाही.
आरतीच्या ताटात मिठाईला महत्व आहे. भावाला मिठाई भरवल्याने नात्यात गोडवा राहतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.