Priya More
बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. या सणाची प्रत्येक बहीण-भाऊ आतुरतेने वाट पाहतात.
रक्षाबंधन सण भाऊ आणि बहिणीमधील प्रेमाचे नाते अधिक घट्ट करण्यासाठी साजरा केला जातो.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्य आणि आनंदासाठी प्रार्थना करते.
रक्षाबंधन सणानिमित्त बहीण आणि भाऊ जोरदार तयारी करतात. या दिवशी सुंदर कपडे परिधान केले जातात.
रक्षाबंधनाचा सण बहिणीसाठी खूप खास असतो कारण या दिवशी भाऊ आपल्या लाडक्या बहिणीला गिफ्ट देतो.
रक्षाबंधनानिमित्त बहीण आपल्या हातांवर सुंदर डिझाइन असलेली मेहंदी काढून हातांचे सौंदर्य वाढवते.
रक्षाबंधनाचा सण आणखी खास आणि स्मरणीय व्हावा यासाठी हातावर मेहंदी काढली जाते.
रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी बऱ्याचदा हातावर मेहंदी काढतात. बहीण-भावाला राखी बांधातानाची देखील मेहंदी डिझाइन काढली जाते.
मेहंदीचा रंग बहीण- भावाच्या प्रेमाची खोली देखील प्रतिबिंबित करतो आणि रक्षाबंधनाचा दिवस खास करतो.