Dhanshri Shintre
राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राजधानीचा किल्ला होता आणि जवळपास २५ वर्षे तो राजधानी म्हणून वापरला गेला.
या किल्ल्याला पूर्वी मुरुंबदेव किल्ला म्हणून ओळखले जात असे, नंतर महाराजांनी त्याचे नाव बदलून राजगड ठेवले.
किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे १,३७६ मीटर उंच आहे आणि त्याची रचना त्रिकोणी स्वरूपात आहे.
राजगडावर सुवेळा माची, संजीवनी माची आणि पद्मावती माची या तीन महत्त्वाच्या माची आहेत.
इथे महाराजांचा दरबार, निवासस्थान आणि इतर महत्त्वाच्या इमारती होत्या.
युद्धनितीच्या दृष्टीने मजबूत रचना असलेली ही माची संरक्षणासाठी महत्त्वाची होती.
ही माची शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त होती.
राजगडाच्या शिखरावर असलेला बालेकिल्ला रणनीती आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असून तिथून आजूबाजूचे किल्ले स्पष्ट दिसतात.
याच किल्ल्यावर महाराजांच्या पत्नी सईबाईंचे निधन झाले, तसेच अनेक महत्त्वपूर्ण राजकीय व लष्करी निर्णय इथे घेतले गेले.