Akshay Baisane | अक्षय बैसाणे
२०१४ मध्ये आलेला फँड्री चित्रपट आठवतोय?
फँड्री चित्रपटात सोज्वळ असलेली शालू अर्थात राजेश्वरी खरात आज एक सुंदर मॉडेल झाली आहे.
फक्त सुंदरच नाही तर ती तेवढीच बोल्ड आणि बिनधास्त झाली आहे.
राजेश्वरी हिने ९ वी मध्ये असताना या चित्रपटात काम केले.
राजेश्वरी हिने आपल्या अभिनयाची सुरुवात सोमनाथ अवघडे या नटासोबत केली. फॅंड्री फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता व त्याचे दिग्दर्शन नागराज मंजुळे यांनी केले होते.
राजेश्वरी हिचा जन्म ८ एप्रिल १९९८ ला झाला. ती पुण्यात राहते.
शालूचं पात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी मेहनत घेणारी शालू आता प्रचंड बदलली आहे. राजेश्वरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.
तिचे सुंदर फोटोज पाहून चाहते तिच्या प्रेमात पडले आहेत. अनेकजण तिला सोशल मीडियावर थेट लग्नाची मागणी घालतात.
राजेश्वरी खरात ही चित्रपट पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून पुढे आली. राजेश्वरीचे वडील बँकेत काम करतात. ती मूळची विदर्भातील आहे.
२०१४ मध्ये फॅंड्री आणि २०१७ मध्ये आयटमगिरी या चित्रपटांमधून ती प्रेक्षकांच्या समोर आली आहे. याशिवाय काही शॉर्टफिल्मस आणि अल्बममध्येही तिने काम केलं आहे.
राजेश्वरीला फोटो काढायला फार आवडतं. ती मॉडेलिंगही छान करते. इन्स्टाग्रावर तिचे एका पेक्षा एक बोल्ड फोटोज आहेत.
इन्स्टाग्रामवर तिचे ३ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहे. ती अनेकांच्या स्वप्नातली राणी आहे.
शालूचं लग्न कधी होणार हे माहीत नाही, पण तिचं लग्न झाल्यानंतर अनेकांचं हृदय तुटणार हे मात्र नक्की.