Mumbai To Dahanu Travel: रेल्वे की बस? मुंबई ते डहाणू प्रवास कसा कराल? जाणून घ्या ट्रॅव्हल टिप्स

Dhanshri Shintre

रेल्वेने प्रवास

मुंबईच्या चर्चगेट, दादर किंवा अंधेरी स्थानकाहून डहाणू लोकल किंवा डहाणू रोड एक्सप्रेस पकडता येते. हा प्रवास सुमारे २.५ ते ३ तासांचा असतो.

एसटी बसने प्रवास

मुंबई सेंट्रल, बोरीवली, विरार येथून डहाणूकडे एसटी महामंडळाच्या बस सेवा उपलब्ध आहेत. हे प्रवास सुमारे ४ ते ५ तासांचा असतो.

प्रायव्हेट कारने प्रवास

मुंबईहून NH-48 मार्गे वसईमार्गे डहाणूला सहज पोहोचता येते. अंतर सुमारे १४० किमी असून ३.५ ते ४ तास लागतात.

कॅब बुकिंग

ओला, उबेर किंवा स्थानिक टॅक्सी सेवेद्वारे मुंबईहून थेट डहाणूला जाता येते. विशेषतः कुटुंबांसाठी हे अधिक आरामदायक ठरते.

बाईकने प्रवास

जर तुम्ही बाईकप्रेमी असाल, तर मुंबईहून वसई-पालघर मार्गे डहाणूपर्यंत बाईक ट्रिप घेऊ शकता. निसर्गदृश्य मार्ग आहे.

मुंबई उपनगरांमधून

विरार, नालासोपारा, वसई या ठिकाणांहूनही थेट डहाणू लोकल्स उपलब्ध आहेत. उपनगरांमधून प्रवास अधिक सोपा होतो.

डहाणू स्थानिक आकर्षण

डहाणू पोहोचल्यानंतर समुद्रकिनारा, चिकू बागा आणि पारंपरिक वारली कला पाहण्यासारखी ठिकाणं आहेत.

प्रवासाचा योग्य काळ

नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा काळ डहाणू भेटीसाठी योग्य मानला जातो. हवामान थंडगार आणि आल्हाददायक असते.

NEXT: कोल्हापूरहून अक्कलकोटपर्यंतचा प्रवास कसा कराल? वाचा बस, कार आणि रेल्वे पर्याय

येथे क्लिक करा