Shraddha Thik
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी हे रायगडावरील सर्वात प्रसिद्ध आणि प्रमुख ठिकाण आहे. ही समाधी पाहण्यासाठी परदेशातूनही पर्यटक येथे येत असतात. महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराजंनी ही समाधी बांधली.
टकमक टोकाला पनिशमेंट पॉइंट म्हणूनही ओळखले जाते. टकमक टोक हे रायगडावरील सर्वोत्तम व्यूव्ह पॉइंटपैकी एक आहे. या खोऱ्यात देशद्रोह्यांना शिक्षा करण्यात येत असे. रायगडावरील हे ठिकाण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.
या किल्ल्यात जिजामाता पॅलेस आहे. हा पॅलेस राजमाता जिजाऊंना समर्पित आहे. हे ठिकाणी पर्यटकांना वेगळीच उर्जा देऊन जाते.
ब्रिटीश राजवटीत या जिजाऊंच्या वाड्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. त्याची मूळ रचना राहिली नसली तरी त्याचे अवशेष जिजाऊंच्या धैर्याची आणि शौर्याची साक्ष देतात.
पाचपड येथे एक कृत्रिम तलाव आहे, त्याला गंगासागर तलाव म्हणून ओळखले जाते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात हा तलाव बांधण्यात आला होता.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले जगदीश्वर मंदिर हे खूप प्रसिद्ध आणि प्रेरणा देणारे मंदिर आहे. शिवाजी महाराज या मंदिरात रोज येत असत. या मंदिराचा घुमट मुघल स्थापत्यकला दर्शवतो.
रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी हे संग्राहालय असून या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या साम्राज्याची वेगवेगळी चित्रे ठेवण्यात आली आहेत. या संग्रहालयाला भेट देताना एक चित्रपटही दाखवला जातो.