रेबीज झाल्यावर माणसं खरंच कुत्र्यांसारखं भुंकू लागतात?

Bharat Jadhav

रेबीज कसा होतो?

रेबीज हा एक धोकादायक आजार आहे. हा प्राणघातक आजार संक्रमित कुत्र्यांच्या लाळेतून पसरतो. रेबीज मानवी मज्जासंस्थेवर हल्ला करतो. हा आजार संक्रमित प्राण्याच्या चाव्याने, ओरबडणे, किंवा प्राण्याच्या लाळेतून पसरतो.

रेबीजची लक्षणे

रेबीजची सुरुवातीची लक्षणे फ्लू सारखी असू शकतात. २ ते ३ दिवसांत जीवघेणी ठरू शकतात. सुरुवातीला ताप आणि डोकेदुखीचा त्रास होतो. अस्वस्थता आणि चिंता जाणवते. घशात पेटके येणे आणि गिळण्यास त्रास होतो.

रेबीज झालेले लोक कुत्र्यांसारखे भुंकतात

डॉक्टरांच्या मते जर एखाद्या व्यक्तीला संक्रमित कुत्र्याने चावा घेतला आणि रेबीज झाला तर ती व्यक्ती कुत्र्यासारखी भुंकत नाही.

हायड्रोफोबिया होतो

रेबीजचा परिणाम फक्त ब्रेनस्टेमवर होत असतो. यामुळे स्नायूंचे आकुंचन होते, ज्यामुळे रुग्णांना पाणी पिणे कठीण होते. रेबीजमुळे हायड्रोफोबिया होतो.

पाण्याची भीती वाटू लागते

हा आजार मेंदूतील नसांवर गंभीर परिणाम करत असतो. व्यक्तीच्या वागणुकीत अडथळा येत असतो. रुग्णांना पाण्याची तीव्र भीती वाटू लागते. पाणी दिसल्यास ते घाबरून किंचाळू लागतात.

रेबीज टाळता येतो का?

कोणत्याही प्राण्याने चावा घेतल्यानंतर लगेच लसीकरण केले पाहिजे. २४ तासांच्या आत लस घेणे आवश्यक असते. त्यानंतर एकूण ४ ते ५ डोस घेणे आवश्यक आहे. लस घेतल्याने संसर्ग टाळता येतो.