ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पुणे विमानतळावर नवा विक्रम केला एकाच दिवसात सर्वोच्च उड्डाणे पुणे विमानतळावर करण्यात आले.
पुणे विमानतळावर एका दिवसात एकूण २१० विमानांची वाहतूक झाली.
पुणे विमानतळावर १०५ विमानांचे उड्डाण झाले आणि १०५ विमाने धावपट्टीवर उतरली
यामध्ये एकूण ३३,000 प्रवाशांनी प्रवास केला.
विमानांची संख्या वाढली तरी ‘पार्किंग बे’ची समस्या उद्भवली नाही.
प्रवाशांना विलंब न होता विमान वाहतूक सुरळीत पार पडली.
यापूर्वीचा विक्रम २०८ विमानांचा होता; रविवारी तो मोडीत काढला गेला.
यंदाच्या उन्हाळी हंगामात हवाई दलाने २१८ स्लॉट उपलब्ध करून दिले.