Manasvi Choudhary
आजकाल अनेकजण ऑफिसमध्ये किंवा वर्क फ्रॉम होम करताना कॉम्प्युटरसमोर तासनतास एकाच जागी बसून काम करतात. पण तुम्हाला माहीत आहे का? दिवसभर सलग बसून काम केल्यामुळे आरोग्यावर अत्यंत गंभीर परिणाम होऊ शकतात.
डेस्क जॉब करणाऱ्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणत्या महत्त्वाच्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत, ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
सतत एकाच ठिकाणी बसून काम केल्यामुळे कंबर आणि पाठदुखीचा त्रास उद्भवू शकतो. यापासून आराम मिळवण्यासाठी दर ४५ मिनिटांनी किमान २ मिनिटे उभे राहा किंवा थोडे चालून या.
सतत पुढे वाकून काम केल्यामुळे पाठीला बाक येऊ शकतो आणि तीव्र थकवा जाणवतो. नेहमी बसताना खुर्चीवर पाठीला योग्य आधार (Back Support) देऊन ताठ बसा.
तासनतास खाली मान घालून काम केल्याने मान आणि खांदे दुखू शकतात. यासाठी तुमचा लॅपटॉप वा कॉम्प्युटरची स्क्रीन नेहमी तुमच्या डोळ्यांच्या सरळ रेषेत (Eye Level) ठेवा.
कामाच्या ओघात अनेकजण पाणी पिण्याचे विसरतात किंवा टाळतात. स्नायूंचे आरोग्य आणि चयापचय क्रिया सुरळीत ठेवण्यासाठी दिवसभरात किमान ३ लीटर पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.
नियमितपणे संध्याकाळी किंवा कामातून वेळ काढून १० मिनिटे कंबरेचे आणि मानेचे हलके व्यायाम करा, ज्यामुळे शरीरातील ताणलेले स्नायू मोकळे होतात.
रात्री झोपण्याआधी तुमचे पाय आणि स्नायू थोडे स्ट्रेच करा (Leg Stretching), ज्यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि सकाळी उठल्यावर ताजेतवाने व फ्रेश वाटते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.