Shruti Vilas Kadam
प्रोसेस्ड फूडमध्ये साखर, मीठ आणि अस्वस्थ फॅटचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे वजन जलद वाढते आणि स्थूलता (Obesity) वाढण्याचा धोका वाढतो.
फास्ट फूड, पॅकबंद स्नॅक्स आणि तळलेले पदार्थ कोलेस्ट्रॉल वाढवतात. यामुळे हृदयविकार, ब्लॉकेज आणि हार्ट अटॅकचा धोका वाढतो.
जास्त साखर आणि रिफाइंड कार्ब्स असलेले प्रोसेस्ड पदार्थ रक्तातील साखर वाढवतात. यामुळे टाइप-2 डायबिटीजचा धोका वाढतो.
प्रोसेस्ड फूडमध्ये फायबर खूपच कमी असते. त्यामुळे अॅसिडिटी, गॅस, बद्धकोष्ठता आणि पचन बिघडण्याची समस्या निर्माण होते.
हे पदार्थ चवदार असले तरी शरीराला आवश्यक असलेले व्हिटामिन्स, खनिजे आणि फायबर कमी प्रमाणात मिळतात. यामुळे शरीर कमकुवत होते.
अत्याधिक प्रोसेस्ड फूडमध्ये प्रिझर्व्हेटिव्ह, कृत्रिम रंग आणि केमिकल्स असतात. हे घटक दीर्घकाळात कॅन्सरचा धोका वाढवू शकतात.
जंक फूडमधील जास्त साखर व ट्रान्स फॅट मूड स्विंग, थकवा, ताण आणि डिप्रेशनसारख्या मानसिक समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.