Shruti Vilas Kadam
कान्स लायन्स इंटरनॅशनल फेस्टिव्हल ऑफ क्रिएटिव्हिटी 2026 मध्ये प्रियांका चोप्राने तिच्या आकर्षक फॅशन सेन्सने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली. ती या कार्यक्रमात स्पीकर म्हणूनही सहभागी झाली होती.
या कार्यक्रमासाठी प्रियांकाने डिझायनर Silvia Tcherassi चा रंगीबेरंगी सॅटिन हॉल्टर-नेक ड्रेस परिधान केला होता. या ड्रेसची किंमत सुमारे 1.81 लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे.
बर्न्ट ऑरेंज, एमराल्ड ग्रीन, यलो आणि ब्लश पिंक अशा रंगांच्या आकर्षक मिश्रणामुळे हा ड्रेस विशेष ठरला. सॅटिन फॅब्रिकमुळे संपूर्ण लूक अधिक एलिगंट दिसत होता.
प्रियांकाने या लूकसोबत हलके दागिने, स्टायलिश सँडल्स आणि सॉफ्ट वेव्ही हेअरस्टाईल ठेवली. त्यामुळे रंगीबेरंगी ड्रेस असूनही तिचा लूक संतुलित आणि क्लासी दिसत होता.
फॅशनसोबतच प्रियांकाने कार्यक्रमात स्टोरीटेलिंग, ओरिजिनॅलिटी आणि स्वतःची ओळख जपत काम करण्याबाबत प्रेरणादायी विचारही मांडले.
प्रियांकाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, तिच्या या ग्लॅमरस लूकचे चाहते आणि फॅशनप्रेमींनी भरभरून कौतुक केले आहे.
कान्स लायन्स 2026 मधील या स्टायलिश उपस्थितीमुळे प्रियांका चोप्राने जागतिक स्तरावर भारतीय फॅशनचा ठसा उमटवत पुन्हा एकदा स्वतःला फॅशन आयकॉन म्हणून सिद्ध केले.