Dhanshri Shintre
पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घ्या; आजारांपासून बचावासाठी आहारात पोषक ज्युसचा समावेश करणे उपयुक्त ठरते.
पावसाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात व्हिटॅमिन C असलेला संत्र्याचा रस समाविष्ट करा; यामुळे आजारपणापासून बचाव होतो.
व्हायरल इन्फेक्शन टाळण्यासाठी आहारात आले व लिंबाचा रस घालावा; यातील सूज कमी करणारे आणि बॅक्टेरिया विरोधी गुण आरोग्यास फायदेशीर आहेत.
बीटा कॅरोटीन व व्हिटॅमिन A ने भरलेला गाजराचा रस डोळ्यांसाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी उपयुक्त ठरतो.
डाळिंब्याच्या रसामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि पॉलीफेनॉल मुबलक प्रमाणात असतात, जे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात.
अँटिऑक्सिडंट्स व एन्झाईम्सने भरलेला पपईचा रस दैनंदिन आहारात घाला; यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते.
टोमॅटोचा रस व्हिटॅमिन C ने समृद्ध असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो आणि व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव करण्यात मदत करतो.
लिंबू व मधाचा ज्यूस प्या; यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीर आजारांपासून सुरक्षित राहते.