ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गरोदरपणात महिलांचे मूडस्विंग्स सतत बदलत असतात.
गरोदरपणाच्या या काळात कुणाला आंबट तर कुणाला गोड खाण्याची इच्छा होते.
यालाच गर्भवती स्त्रीला डोहाळे लागतात असं म्हटलं जाते. पण डोहाळे का लागतात ते माहित करून घ्या
गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आवडी-निवडीवरही होतो.
शरीरात हार्मोनल बदल होत असल्याने गरोदर महिलांना आंबट खावेसे वाटतात. ज्यामुळे महिलांना लोणचे ते चिंचेपर्यंत खाण्याची लालसा वाटू लागते.
आंबट पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्याचे काम करते.
लिंबू, कच्चा आंबा, आवळा किंवा लोणचे यासारख्या आंबट गोष्टी गर्भवती महिला खातात जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात