Manasvi Choudhary
डाळिंब हे अनेक पोषक घटक आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध फळ आहे. मात्र काही व्यक्तींना डाळिंबाचे सेवन करताना काळजी घ्यावी.
जे लोक रक्ताची गुठळी होऊ नये म्हणून रक्त पातळ करणारी औषधे घेतात त्यांनी डाळिंब किंवा डाळिंबाचा रस पिणे टाळावे.
डाळिंबामध्ये रक्तदाब कमी करण्याचे गुणधर्म असतात. जर तुम्हाला आधीच लो बीपीचा त्रास असेल तर तुम्ही डाळिंब खाणे टाळावे.
डाळिंब थंड असते ज्यामुळे ज्या लोकांना वारंवार सर्दी, खोकला, कफ किंवा अस्थमाचा त्रास असेल, त्यांनी डाळिंब खाणे टाळावे, कारण यामुळे कफ होऊ शकतो.
डाळिंबामध्ये नैसर्गिक अमिनो आणि सायट्रिक ॲसिड असते. ज्या लोकांना तीव्र ऍसिडिटी , छातीत जळजळ किंवा पोटाचा अल्सर आहे, त्यांनी डाळिंब खाऊ नये.
डाळिंबामध्ये नैसर्गिक साखर असते यामुळे मधुमेहाच्या रूग्णांनी डाळिंबचे सेवन करणे टाळले पाहिजे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.