Manasvi Choudhary
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त 'पंतप्रधान विश्वकर्मा' योजना सुरू केली आहे.
कारागिरांच्या उत्पादनांचा आणि सेवांचा दर्जा वाढवण्याचा तसेच त्यांना देशांतर्गत बाजारपेठ आणि जागतिक बाजारपेठेशी जोडण्याचा या योजनेचा मुख्य हेतू आहे.
'पंतप्रधान विश्वकर्मा'योजनेचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड, ओळखपत्र , राहिवासी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र , मोबाईल नंबर आणि पासपोर्ट फोटो ही कागदपत्रे असणे महत्वाचे आहे.
सार्वजनिक सेवा किंवा नागरी सुविधा केंद्रात तुम्ही 'पंतप्रधान विश्वकर्मा' योजनेचा अर्ज करू शकता. तसेच या योजनेची माहिती अधिकृत वेबसाईट pmvishwakarma.gov.in वर उपलब्ध आहे.
या योजनेअंतर्गत सरकारकडून विना हमीचे ३ लाख रूपयांचे कर्ज ५ टक्के व्याजदराने उपलब्ध होईल.
सुतार, सोनार, शिल्पकार आणि कुंभार यासह इतर १८ पारंपारिक कुशल कारागिरांना 'पंतप्रधान विश्वकर्मा' योजनेचा लाभ घेता येईल.
विश्वकर्मा योजनेंतर्गत, सरकार 13,000 कोटी रुपये खर्च करणार आहे.
'पंतप्रधान विश्वकर्मा'या योजनेद्वारे कामगारांना मूलभूत आणि प्रगत असे विशेष प्रशिक्षण दिले जाईल.