Bharat Jadhav
इमॅन्युएल मॅक्रॉन हे २६ जानेवारी रोजी दिल्लीत होणाऱ्या ७५ व्या प्रजासत्ताक दिन समारंभाचे प्रमुख पाहुणे आहेत. या भव्य कार्यक्रमात सहभागी होणारे ते फ्रान्सचे सहावे नेते असतील.
पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी हवा महलला भेट दिली. यादरम्यान मॅक्रॉन यांनी हवा महलबाबत काही प्रश्नही विचारले.
रोड शोनंतर पंतप्रधान मोदींनी मॅक्रॉन यांना राम मंदिराचे मॉडेल भेट दिले. यासाठी त्यांनी UPI पेमेंट करून ५०० रुपयांचे बिल दिले.
मॅक्रॉन आणि पंतप्रधान मोदी यांच्यातील मैत्री साऱ्या जगाला पाहायला मिळाली. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी घेत घेतली.
मोदी आणि मॅक्रॉन यांचा रोड शो त्रिपोलिया गेटपासून सुरू झाला. यावेळी मार्गावर उपस्थित नागरिकांनी मोदी-मोदीच्या घोषणा देत पुष्पवृष्टी केली.
पीएम मोदी राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन हे डिनरसाठी हॉटेल रामबाग पॅलेसमध्ये गेले. येथे दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय चर्चाही झाली.
कारमध्ये बसल्यानंतरही पंतप्रधान मोदी मॅक्रॉनशी बोलताना दिसत आहेत. त्यांना गाडीच्या आतून अनेक गोष्टींची माहिती दिली. दोघांमध्ये हशा आणि विनोद होत असल्याचं दिसलं.
मॅक्रॉन हे गुरुवारी दुपारी जयपूरला पोहोचले. यावेळी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी एका दुकानात चहा घेतला. येथे त्यांनी सुमारे १०मिनिटे थांबून चहाचा आस्वाद घेतला. पंतप्रधान मोदींनी अध्यक्ष मॅक्रॉन यांना चहाबाबत माहिती दिली.
येथे क्लिक करा