Chetan Bodke
सध्या देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. काल (३० मे) प्रचाराच्या तोफा थंडावल्या.
निवडणूक प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी ध्यानधारणेसाठी कन्याकुमारीत पोहोचले.
पंतप्रधान कन्याकुमारीत पोहोचल्यानंतर सर्वात आधी त्यांनी भगवती अम्मन मंदिरामध्ये पूजा केली.
त्यानंतर ते बोटीने विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पोहोचले.
कन्याकुमारीतल्या विवेकानंद रॉक मेमोरियलमध्ये पंतप्रधान ४५ तास ध्यानधरणा करणार आहेत.
पंतप्रधान या ४५ तासांत फक्त नारळ पानीसह फळांचा ज्यूस पिणार आहेत.
PM नरेंद्र मोदी ध्यानधारणेनंतर दिल्लीला रवाना होणार आहेत.