साम टिव्ही ब्युरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईमध्ये वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विघ्नहर्ता गणेशजींची मुर्ती आणि वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसचं प्रतिमा पंतप्रधानाना भेट
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या प्लॅटफॉर्म क्रमांक- १८ वरून पंतप्रधान मोदींनी दोन्ही हायस्पीड ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
एक वंदे भारत गाडी मुंबई ते साई धाम शिर्डी आणि दुसरी मुंबई ते सोलापूर धावणार आहे.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचा यात्रेकरूंना मोठा फायदा होणार आहे.नवीन ट्रेनमुळे मुंबई आणि सोलापूर यांच्यातील कनेक्टिव्हिटी सुधारेल.