Manasvi Choudhary
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निवासस्थानी असलेल्या कमी उंचीच्या गोंडस गायींची सेवा करत मकर संक्रांत दिवस साजरा केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत सोशल मीडियावर हे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत.
या फोटोमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गायींना चारा खाऊ घालताना दिसत आहे.
कमी उंचीच्या गोंडस दिसणाऱ्या या गायी पुंगनूर प्रजातीच्या आहेत.
दक्षिण भारतातील पुंगनूर येथे या गायींची उत्पत्ती झाल्याचे बोलले जाते. यामुळे या गायींना पुंगनूर हे नाव पडले.
जगातील सर्वात कमी उंचीच्या गायी म्हणून या प्रसिद्ध आहेत. पुंगनूर गायींच्या दुधामध्ये सोन्याचा अंश असतो. असे मानले जाते.
तिरूपती मंदिराच्या क्षीराभिषेकामध्येही पुंगनूर गायींच्या दुधाचा अभिषेक घातला जातो.
या गायींचे दूध अतिशय पौष्टिक असते. तर या गायींच्या दुधामध्ये इतर गायींच्या तुलनेने फॅट्सचे प्रमाण अधिक असते.