Manasvi Choudhary
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आपला ७३ वा वाढदिवस साजरा करत आहेत.
वयाच्या ७३ व्या वर्षीही इतके अॅक्टिव्ह असणारे पीएम मोदी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतात.
पंतप्रधान मोदी आपल्या व्यस्त शेड्युलमधून निरोगी आरोग्यासाठी वेळ काढतात.
पीएम मोदी त्यांच्या दिवसाची सुरुवात मॉर्निंग वॉक आणि मेडिटेशनने करतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदी नियमितपणे योगाभ्यास, प्राणायम आणि सूर्यनमस्कारही करतात.
हायड्रेट राहण्यासाठी पीएम मोदी दररोज फळांचे ज्यूस पितात. वर्षभर ते कोमट पाणीच पितात.
मसालेदार पदार्थ खाणं ते कटाक्षाने टाळतात. त्यांच्या आहारामध्ये ताजी फळं, भाज्या, दही यांचा समावेश असतो.
पंतप्रधान मोदींना गुजराती जेवण आणि खिचडी खायला प्रचंड आवडते.
पीएम मोदी २४ तासांत फक्त ४-५ तासच झोप घेतात.