Gangappa Pujari
देशाचे लाडके आणि लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस.
RSS चे प्रचारक म्हणून नरेंद्र मोदी यांच्या कार्याची सुरूवात झाली. हळूहळू ते भाजप आणि आरएसएसचे नेते म्हणून उदयाला आले.
२०१४ मध्ये पंतप्रधान होण्यापुर्वी नरेंद्र मोदी २००१ ते २०१४ याकाळात जवळपास १२ वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांच्या यादीमध्ये नरेंद्र मोदी यांचे नाव घेतले जाते.
पंतप्रधान मोदी यांना महिन्याला जवळपास दोन लाख रुपये पगार मिळतो.
पंतप्रधान मोदी यांच्याकडे एकूण 2.23 कोटींची संपत्ती आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, मोदींची 2.23 कोटींची संपत्ती वेगवेगळ्या बँकांमध्ये जमा आहे.
31 मार्च 2022 पर्यंत पंतप्रधान मोदींकडे रोख रक्कम फक्त 35,250 रुपये इतकी होती.
तसेच पोस्ट ऑफिसमध्ये ९,०५,१०५ रुपयांची नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफेकेट्स (NSC) आहेत. तर, 1,89,305 रुपयांची LIC पॉलिसी आहे.