Plank Exercise: वजन कमी करायचं आहे? मग रोज सकाळी १० मिनिट करा प्लँक एक्सरसाइज, मिळतील हे ७ फायदे

Shruti Vilas Kadam

पोटाचे स्नायू मजबूत होतात

प्लँक केल्यामुळे पोटाचे स्नायूंवर ताण येतो. त्यामुळे पोटाचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते.

Plank

कंबर आणि पाठ मजबूत होण्यास मदत

योग्य पद्धतीने प्लँक केल्यास पाठीच्या आणि कंबरेच्या स्नायूंना आधार मिळतो आणि पोश्चर सुधारण्यास मदत होते.

Plank Pose | Saam Tv

पोटाचा भाग टोन होण्यास मदत

नियमित प्लँकमुळे पोटाचे स्नायू सक्रिय राहतात. मात्र केवळ प्लँक केल्याने पोटाची चरबी कमी होत नाही; त्यासाठी आहार आणि इतर व्यायामही महत्त्वाचे आहेत.

Plank Pose | Saam Tv

शरीराचा बॅल्नस सुधारतो

प्लँक करताना शरीर स्थिर ठेवावे लागते. त्यामुळे बॅल्नस आणि शरीराची स्थिरता सुधारण्यास मदत होते.

Plank Pose

खांदे, हात आणि पायांवरही परिणाम

प्लँक हा फक्त पोटासाठी नसून खांदे, हात, नितंब आणि पायांचे स्नायूही सक्रिय करतो.

Plank Pose | Saam Tv

कसं करावं?

कोपर खांद्याच्या सरळ खाली ठेवून पाय मागे ताणा. डोक्यापासून टाचांपर्यंत शरीर एका सरळ रेषेत ठेवा, पोट आत ओढून श्वास सामान्यपणे घ्या. कंबर वर उचलू नका किंवा खाली सोडू नका.

Plank Exercise | Google

10 मिनिटे करण्याची गरज नाही

सुरुवातीला 20–30 सेकंदांचे 3 सेट पुरेसे आहेत. क्षमता वाढल्यावर वेळ हळूहळू वाढवा. 10 मिनिटे सलग प्लँक करण्यापेक्षा योग्य पोश्चर ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे.

Plank Exercise

Pooja Sawant: पूजा सावंतचा गुलाबी साडीत खुलला मराठमोळा अंदाज; चाहत्यांच्या खिळल्या नजरा

Pooja Sawant | Saam Tv
येथे क्लिक करा