Shruti Vilas Kadam
या DIY टोनरसाठी तुम्हाला फक्त गुलाबपाणी, टी ट्री ऑइल आणि सफरचंदाचा व्हिनेगर (Apple Cider Vinegar) लागतो.
हा टोनर विशेषतः ऑयली व पिंपल असलेल्या त्वचेसाठी फायदेशीर असला तरी सौम्य असल्यामुळे सगळ्यांसाठी उपयुक्त आहे.
टी ट्री ऑइलमधील अँटीसेप्टिक गुणधर्म त्वचेची सूज व जळजळ कमी करण्यात मदत करतात.
सफरचंदाच्या व्हिनेगरमधील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म मुरुमंना कारणीभूत ठरणाऱ्या जीवाणूंना नष्ट करतात.
गुलाबपाण्यामुळे त्वचा हायड्रेट होते, थंडावा मिळतो आणि नैसर्गिक तेज येते.
रोज रात्री झोपण्यापूर्वी वापरल्यास त्वचेवरील मुरुम, डाग, आणि अतिरिक्त तेल कमी होते.
हा टोनर नैसर्गिक असल्यामुळे त्वचेला कोणतेही साइड इफेक्ट्स होत नाहीत व त्वचेसाठी सुरक्षित आहे.