Shraddha Thik
मूळव्याध चा त्रास आजकाल खूप जास्त प्रमाणात वाढत आहे, शौचाच्या जागेतून रक्त पडणे, मुळव्याधचा त्रास होणे हे आपण घराच्या घरी 10 मिनिटांत थांबू शकतो.
मुळव्याधीपासून आराम मिळवण्यासाठी तसेच पोट साफ़ होण्यासाठी मुळा फार उपयुक्त आहे. 60 ग्राम मुळ्याच्या ताज्या रसात मीठ घालून ते मिश्रण आठवड्यातून दोनदा सलग 40 दिवस घेतल्यास तुम्हाला आराम मिळेल.
तीळ कुटून त्याची पेस्ट मोडांवर लावल्यास , आराम मिळतो. तसेच अर्धा चमचाभर तिळ बटरमध्ये एकत्र करून खाल्ल्यानेदेखील आराम मिळतो.
वेदना , सूज कमी करण्यासाठी बर्फाचा शेक फार हितकारी आहे. मूळव्याधीच्या त्रासात गुदद्वारापाशी वेदना होत असल्यास पाठीवर झोपून बर्फाचा जास्तीत जास्त १० मिनिटांसाठी शेक द्यावा.
जीरे भाजून त्याची पूड करावी. ही पूड गरम पाण्यात टाकून ते पाणी प्यायल्यास रात्री झोप झोपण्यापुर्वी घेतल्यास 3 ते 4 दिवसांत तुम्हाला आराम मिळेल.
स्त्रियांमध्ये मुळव्याधीचा त्रास कमी करण्यासाठी दुर्वा फार उपयुक्त आहेत . 2 चमचे दुर्वा कुटून त्या कपभर गायीच्या दुधात उकळून घ्या. हे मिश्रण गाळून रोज घेतल्यास मुळव्याधीपासून आराम मिळेल.
मुळव्याधीच्या त्रासात जर रक्त पडत असेल तर कांद्याचा रस जरूर घ्या. यासाठी 30 ग्राम कांद्याचा रस व 60 ग्राम साखर एकत्र करून ते मिश्रण काही दिवसांसाठी दिवसातून दोनदा घ्या.
वरील कोणतेही घरगुती उपचार करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.