ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जर पावसात बाहेर गेल्याने तुमचा स्मार्टफोन भिजला असेल तर या टिप्स फॉलो कराव्यात.
जर स्मार्टफोन ओला होऊन बंद झाला असेल, तर सर्व प्रथम स्मार्टफोनमधले पाणी आणि ओलावा पूर्णपणे वाळवा.
स्मार्टफोनमधून बॅटरी काढता येत असेल तर फोनची बॅटरी काढा तसेच सिम कार्ड आणि मायक्रोएसडी कार्ड देखील काढा.
तुमचा स्मार्टफोन तांदळाच्या डब्यात ठेवा. तांदूळ तुमच्या फोनमधील ओलावा शोषून घेतो. यामुळे तुमचा स्मार्टफोन रीस्टार्ट होतो.
जेव्हा तुमचा स्मार्टफोन कोरडा होईल, तेव्हाच तो चार्ज करावा.
जर स्मार्टफोन ओला झाल्यामुळे बंद झाला असेल तर ते सुकविण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करू नका. कारण जास्त गरम केल्याने स्मार्टफोन खराब होण्याचा धोका वाढतो.
ओला स्मार्टफोन चार्ज करू नका. अन्यथा, स्मार्टफोनमधील ओलाव्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकते.