Shraddha Thik
प्रत्येकाला वाटत असतं समजात आपली वेगळी ओळख निर्माण व्हावी त्यासाठी ते खूप प्रयत्नशील असतात.
चारचौघात आपल्याला मान सन्मान मिळावा. फक्त आपली चर्चा व्हावी असं अनेकांना वाटतं. पण सत्यात मात्र तसं होत नाही.
तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी या सवयी आजच आमलात आणा आणि समाजात एक वेगळा मान निर्माण करा.
तुमच्या आयुष्यातल्या खासगी गोष्टी आणि भविष्याबद्दल काय विचार करता किंवा काय प्लानिंग करता ते कधीच कुणाला सांगू नका.
कधीच स्वतःला दोष देऊ नका. कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजात तुमचं मान कमी होतो.
संघर्ष हा कायम एकट्याचा असतो हे लक्षात ठेवा. प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखऱ्यावर पोहोचल्यावर सगळेचजण येतात. अशावेळी हुरळून न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायला हवं.
प्रत्येकवेळी सगळ्यांसाठी हजर राहू नका. कारण तुम्ही सगळीकडे सहज उपलब्ध राहिलात. मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी. कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलंत तरच तुम्हाला मान सन्मान मिळणार आहे.