Surabhi Jayashree Jagdish
व्यस्तता वाढती राहील. नवनवीन संकल्पना व्यवसायाच्या बाबतीत येतील.
नको असलेल्या गोष्टी निघून जातील. पण त्याचा मनस्ताप करू नका. कारण पैसा, खर्च, बंधनयोग आज येतील.
सोनसळी असा दिवस आहे. सुवर्ता यांची बरसात होईल. आपण केलेले कर्म आपल्याबरोबर येते हे आज खास करून जाणवेल.
आपल्या राशीला असणारा भावनिक आणि प्रेमळ स्वभाव आज कामाच्या ठिकाणी सुद्धा सर्वांना घेऊन जाईल.
शक्य असेल तितकी उपासना आज करा. धार्मिक गोष्टींमध्ये सहभाग होईल.
नको असलेल्या ठिकाणी हिशोब करणे आणि हव्या असणाऱ्या ठिकाणी बेहिशोबी राहणे आज करू नका.
जे असेल ते स्वीकारून आज पुढे जावं लागेल. कामांमध्ये यश मिळेल. कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल.
सातत्याने परिस्थितीशी झुंज देणे आता आपल्याला अवघड जाते आहे. आज मात्र दिवस संमिश्र आहे.
आपली संतती हीच आपल्यासाठी संपत्ती आहे हे आपण जाणून आहात. धनयोग चांगले आहेत.
जुन्याचे नवे करण्याचा आजचा दिवस आहे. मग घर असो, आजूबाजूचा परिसर किंवा नाती. दिवसभर कामांमध्ये व्यस्तता राहील.
व्यवसायामध्ये भाग्योदय कारक घटना आज घडणार आहेत. सांधेदुखी व कानाशी निगडित आजार मात्र आज जपावे लागतील.
आपल्यामध्ये रुजलेले संस्कार कुटुंबीयांना विशेष भावतात. काही महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आज कुटुंबामध्ये तुम्हाला पेलाव्या लागतील.