Surabhi Jayashree Jagdish
आजच्या चतुर्थी आहे. गणेश उपासना आपल्या राशीला फलद्रुप होईल.
कलाकारांना सुसंधी घेऊन आलेला दिवस आहे. नाट्यक्षेत्र, मनोरंजन क्षेत्र यात विशेष प्रगती होईल.
बंधन योग आहेत विनाकारण कटकटींच्या गोष्टींचा ससेमीरा मागे लागेल. खर्च वाढतील.
नातेवाईक यांच्या भेटीगाठी होतील. दिवस आनंदात जाईल. जुन्या गुंतवणूक मधून योग्य तो फायदा मिळेल.
यशासाठी झगडावे लागेल. पण यश नक्की मिळेल. वरिष्ठांच्याकडून विशेष कौतुक होईल.
विष्णू उपासनेचे उत्तम फल मिळेल. लांबचे प्रवास होतील. तीर्थक्षेत्रि भेटी होतील.
मोठ्या प्रमाणात धन मिळण्याचे योग आज आहेत. जोडीदाराच्या कुटुंबीयांच्या कडून पैसा मिळेल.
कोर्टाच्या कामात यश मिळेल .जोडीदाराबरोबर व्यवसायाची वृद्धी होईल.
तब्येतीच्या तक्रारी वाढतील. आजोळी प्रेम लाभेल. कौटुंबिक सौख्याला दिवस चांगला आहे.
प्रेमामध्ये अबोला संभवतो आहे. संततीकडून अपेक्षा असल्या तरीही शिक्षणाच्या संदर्भात अडचणी उद्भवतील.
जमिनीचे व्यवहार होतील. जुन्या गोष्टींची देवाणघेवाण यामध्ये विक्री होईल. मातृसौख्य उत्तम.
कार्यक्षेत्रामध्ये अडथळे आल्या तरी नेटाने पुढे जाल. प्रवासाचे योग आहेत.